नवी दिल्ली : उत्तराखंडमधील केदारनाथ आणि चामोलीत भविष्यात नैसर्गिक दुर्घटना होऊ नयेत यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी तंत्र सांगितले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (कानपूर) वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जर हिमालयातील हिमनदी जलग्रहण क्षेत्रांची उपग्रहांद्वारे रियल टाइम देखरेख केली गेल्यास धौलीगंगा आणि केदारनाथमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या आधी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाऊ शकते. उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रियल टाइम माहितीमुळे अशा दुर्घटनांची माहिती आधीच समजेल.या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार हिमालय क्षेत्रांत हिमनद्यांत बनलेली सरोवरे फुटल्यास जीवितहानी टाळण्यासाठी परिणामकारक धोरण असले पाहिजे. या वैज्ञानिकांत डॉ. तरुण शुक्ल आणि प्रोफेसर इंद्र शेखर सेन यांचा समावेश आहे. या अभ्यासात त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मदत केली. हा अभ्यास आंतरराष्ट्रीय मासिक ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
तिसरा ध्रुव nजलवायु परिवर्तनाच्या कारणामुळे तापमान आणि जास्त पावसाच्या घटना वेगाने वाढत आहेत. हिमालयाला जगाचा तिसरा ध्रुवही म्हटले जाते. येथे जगाचा सर्वात मोठा बर्फाळ भाग आहे. nहिमालयातील हिमनद्या तुलनात्मक रूपात वेगाने वितळत आहेत. यामुळे हिमालयात अनेक ठिकाणी सरोवर निर्माण होत आहेत. जर हिमनद्या वितळल्यामुळे सरोवरांच्या वर जास्त पाऊस होत असेल किंवा त्यांच्यावर कोणता मोठा दगड किंवा बर्फाचा तुकडा कोसळत असेल तर त्यामुळे केदारनाथ किंवा चामोलीसारख्या दुर्घटना होतील. nहिमालय यावेळी नैसर्गिक संकटांचे केंद्र बनत आहे. यात धोकादायक घटना हिमनद्यांच्या माध्यमातून बनणारे सरोवर फुटल्यामुळे घडतात.