लांडोर खोरीत निसर्ग पर्यटन उद्यानाची निर्मिती सुरू : पुढील पावसाळ्यापर्यंत खुला होणार
By admin | Published: January 02, 2016 8:30 AM
जळगाव- निसर्ग पर्यटन, दुर्मीळ झाडांची माहिती व इतर उद्देश समोर ठेऊन शहरातील लांडोरखोरीमध्ये उद्यान साकारण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर हे काम सुरू असून, पुढील पावसाळ्यात ते तयार होईल, अशी माहिती जळगाव वन विभागाने दिली आहे.
जळगाव- निसर्ग पर्यटन, दुर्मीळ झाडांची माहिती व इतर उद्देश समोर ठेऊन शहरातील लांडोरखोरीमध्ये उद्यान साकारण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे १० हेक्टरवर हे काम सुरू असून, पुढील पावसाळ्यात ते तयार होईल, अशी माहिती जळगाव वन विभागाने दिली आहे. लांडोरखोरी वन विभागाच्या अखत्यारित असले तरी शहरात सुसज्ज, समृद्ध असा बगीचा नाही. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. ४० लाख मंजूरया कामासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत. ते मार्च अखेरपर्यंत खर्च होतील. आणखी १० लाख रुपये निधीची गरज आहे. उद्यान व इतर सुविधानिसर्ग पर्यटन म्हणून लांडोरखोरीचा विकास करताना त्यात उद्यान हा प्रमुख भाग असणार आहे. त्यात शेकडो दुर्मीळ वनस्पती, झाडे असतील. तसेच लॉन, बसण्यासाठी खुर्च्या, दोन नैसर्गिक तळे, फिरण्यासाठी पदपथ, लहान मुलांसाठी खोळणी, पॅगोडा, अशा अनेक सुविधा असतील. लांडोरखोरी पूर्वी शहराबाहेर होते. आता शहर या खोरीपर्यंत आले आहे. या भागातील रहिवासी, वन्य प्रेमी, लहानगे आदींना फिरण्यासाठी लांडोरखोरी खुली केली जाणार आहे. कुंभार खोरीचाही विकास करणारलांडोरखोरीप्रमाणे कोल्हे हिल्सनजीकच्या कुंभार खोरीचाही विकास केला जाणार आहे. सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावर कुंभार खोरी आहे, असे वन विभागाने स्पष्ट केले. कोट-पुढील पावसाळ्यापर्यंत लांडोरखोरीमध्ये उद्यानाचे काम पूर्ण होईल. त्यासाठी निधी प्राप्त झाला असून, काम जोमाने सुरू आहे. या कामामुळे लांडोरखोरी नागरिकांसाठी खुली होईल. -डी.आर.पाटील, सहायक वनसंरक्षक, जळगाव वनविभाग