शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

नावेदची लाय डिटेक्टर टेस्ट, काश्मिरात हल्ले सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 10:27 PM

उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली

नवी दिल्ली : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली, तसेच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्या दोन फरार साथीदारांची रेखाचित्रे जारी केली आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मिरात दहशतवादी हल्ले तर सिमेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. सीमेवर तणाव असतानाच पाकिस्तान परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा सुरू करण्याची मागणी भारताकडे केली आहे. नावेदचा साथीदार झारघन ऊर्फ मोहम्मद भाई हा ३८ ते ४० वर्षांचा तर अबू ओकाशा हा १७ ते १८ वर्षांचा आहे. एनआयएने या दोघांच्या अटकेसाठी माहिती पुरविणाऱ्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले. नावेदने भारतातील त्याचा संपर्क आणि त्याने कोणत्या मार्गाने घुसखोरी केली याबाबत दिशाभूल केल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर टेस्ट पार पाडण्यात आली. दिल्ली न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार त्याला मंगळवारी सकाळी केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आणण्यात आल्यानंतर काही वेळ एकटे ठेवण्यात आले होते. या चाचणीच्यावेळी गुप्तचर संस्थेसह विविध तपास संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. ५ आॅगस्ट २०१५ रोजी जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी बीएसएफच्या वाहनावर हल्ला केला होता. हल्ला करण्याच्या हेतूने लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी गुलमर्ग भागातून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या अतिरेक्यांच्या ठावठिकाण्यांबाबत विश्वसनीय माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल त्याचवेळी त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. चौकीवर हल्ला; पोलीस शहीद, नागरिक ठारश्रीनगर : सोपोरमधील एका मशिदीच्या सुरक्षेत तैनात पोलिसांवर मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरपासून सुमारे ५२ कि.मी. अंतरावरील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये तुज्जर शरीफजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कॉन्स्टेबल फयाज अहमद याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला. गोळीबारानंतर दहशतवादी पोलिसांजवळील रायफली हिसकावून फरार झाले. अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दले फरार अतिरेक्यांचा शोध घेत असून विविध ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)