शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

नवी मुंबई, इंदूर कचरामुक्तीत आघाडीवर; शहरी विकास मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 1:08 AM

अंबिकापूर, इंदूर, राजकोट, सुरत, म्हैसूर आणि नवी मुंबई या शहरांचा फाइव्ह स्टारमध्ये समावेश आहे.

नवी दिल्ली : सरकारने मंगळवारी कचरा व्यवस्थापनाबाबतची आपली रेटिंग जारी केली. सहा शहरांना फाइव्ह स्टार कचरा मुक्तीचा टॅग देण्यात आला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांची घोषणा केली. अंबिकापूर, इंदूर, राजकोट, सुरत, म्हैसूर आणि नवी मुंबई या शहरांचा फाइव्ह स्टारमध्ये समावेश आहे.एकूण १४१ शहरांना क्रमवारी देण्यात आली आहे. यातील सहा फाइव्ह स्टार, ६५ थ्री स्टार आणि ७० वन स्टार आहेत. नवी दिल्ली, हरयाणातील कर्नाल, आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा, चंदीगड, छत्तीसगडमधील भिलाई नगर, गुजरातमधील अहमदाबाद, मध्यप्रदेशातील भोपाळ आणि झारखंडमधील जमशेदपूर यांचा थ्री स्टारमध्ये समावेश आहे. वन स्टार रेटिंगमध्ये दिल्ली कॅन्टोनमेंट, रोहटक, ग्वाल्हेर, महेश्वर, खंडवा, भावनगर, हाथोद हे मध्यप्रदेशातील शहरे आणि गुजरातमधील बडोदा आणि भावनगर, व्यारा यांचा समावेश वन स्टारमध्ये आहे. १४३५ शहरांनी स्टार रेटिंगसाठी अर्ज केले होते.पुरी यांनी सांगितले की, स्वच्छता आणि कचरामुक्तीचे व्यवस्थापन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे आणण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत अनेक कामे सुरु केली. शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले की, पुरी यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सरकारने लाखो शौचालयांची उभारणी केली.जालन्यासह महाराष्टÑातील ३४ शहरांचा समावेश- थ्री स्टार शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ३४ शहरांना स्थान मिळाले असून त्यात चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे, मीरा-भार्इंदर आदींचा समावेश आहे, तर ४१ शहरांना वन स्टारचे रेटिंग मिळाले. त्यात अहमदनगर, अकोला, नाशिक वसई-विरार आणि कल्याण- डोंबिवली आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई