लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला कोणतीही माहिती हवी असली की, आपण लगेच गुगलवर जातो. अगदी प्रवास करतानाही रस्ते शोधताना गुगल सर्च इंजिन सहजपणे देश-परदेशात वापरले जाते. परदेशामध्ये तर प्रवास करताना गुगल मॅप्स सुरू करण्याची पद्धतच आहे; पण आता भारतात गुगलऐवजी नवीन जीपीएस अॅप येत आहे आणि तेही संपूर्ण भारतीय. ठं५कउ (नाविक) असे या अॅपचे नाव असून, त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्या की, हे जीपीएस सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी दिली आहे. या जीपीएस प्रणालीचे नाविक हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविले आहे. नाविक म्हणजे नौका चालविणारा, म्हणजेच वाटाड्या वा सारथी. ही जीपीएसप्रणाली सात उपग्रहांच्या आधारे चालणार असल्याने ती केवळ भारतापुरती, पण अतिशय अचूक असेल, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. हिंदी महासागरासह देशाच्या आसपासच्या भागाची माहितीही ‘नाविक’मध्ये कळू शकेल. जगातील काही देशांमध्येच स्वत:ची जीपीएसप्रणाली आहे. अशा देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश होणार आहे. अमेरिकेची जीपीएसप्रणाली २४ उपग्रहांना जोडण्यात आली आहे. अर्थात अमेरिका हा देशही अतिशय अवाढव्य आहे, तसेच तेथील जीपीएसप्रणालीही जगभरात अचूक म्हणून ओळखली जाते. भारताची नाविकप्रणालीही तशीच असेल, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे.
गुगलऐवजी आता नाविकची जीपीएसप्रणाली
By admin | Published: May 29, 2017 1:16 AM