चंदीगड : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Sigh Badal) यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर डीजीपींना भेटून पोलिसांवर दबाव आणल्याचे बादल यांनी सिद्ध केले तर मी राजकारणाला रामराम ठोकेन, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले की, '2015 मध्ये निष्पाप शीख मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेणाऱ्या पंजाबच्या नवीन डीजीपींसोबत माझी कधीही इन-कॅमेरा बैठक झाल्याचे सुखबीर सिंग बादल यांनी सिद्ध केले तर मी राजकारण सोडेन. बादल यांना चिट दिली आणि नवीन सरकार स्थापन झाल्यापासून माजी डीजीपी सैनी यांचे दिवाने बनले आहेत.
काय म्हटले होते बादल ?दरम्यान, एसएडीचे प्रमुख बादल यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री चन्नी यांनी सिद्धू आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांची भेट घेतल्यानंतर अकाली दलाचे ज्येष्ठ नेते बिक्रम सिंह मजिठिया यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवण्याचे आदेश राज्याच्या डीजीपींना दिले आहेत. सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधले आणि अकालींविरुद्ध राजकीय सूड उगवला. मी सीएम चन्नी यांना या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचे आव्हान देतो.
मजिठिया हे हरसिमरत कौर बादल यांचे भाऊयेत्या काही दिवसांत बिक्रम सिंह मजिठिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची भीती बादल यांनी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषण करण्याचा आणि अन्य मार्गाने मजिठिया यांच्यावर या बेकायदेशीर कारवाईसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मजिठिया हे माजी केंद्रीय मंत्री आणि भटिंडाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांचे भाऊ आहेत.
नवज्योतसिंग सिद्धूविरोधात खटलापंजाबमधील कथित अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पंजाब पोलिसांच्या एसआयटीचा तपास अहवाल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात दाखल करण्यात आला आहे. बंद लिफाफ्यात सादर केलेला हा अहवाल उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच उघडता येणार आहे. असे असतानाही नवज्योतसिंग सिद्धू हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. या प्रकरणाबाबत हरियाणाच्या अॅडव्होकेट जनरलसमोर नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्याची सुनावणीही सुरू आहे.