Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू कायम राहतील; हरीश रावत म्हणाले,'उद्या अधिकृत घोषणा होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:05 PM2021-10-14T22:05:23+5:302021-10-14T22:05:48+5:30

Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी गुरुवारी संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांची भेट घेतली.

Navjot Singh Sidhu To Continue As Punjab Congress Chief Formal Announcement On Friday Harish Rawat | Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू कायम राहतील; हरीश रावत म्हणाले,'उद्या अधिकृत घोषणा होईल'

Navjot Singh Sidhu : पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू कायम राहतील; हरीश रावत म्हणाले,'उद्या अधिकृत घोषणा होईल'

Next

नवी दिल्ली : पंजाबकाँग्रेसमधील (Punjab Congress) अंतर्गत वादानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे  आपल्या पदावर कायम राहतील. गुरुवारी हरीश रावत म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबकाँग्रेसचे अध्यक्ष राहतील आणि संघटना मजबूत करतील हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली जाईल. पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना हरीश रावत म्हणाले की, आम्ही सर्व मुद्दे चर्चेतून सोडवू. नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे. लवकरच ज्या काही समस्या असतील त्या चर्चेतून सोडवल्या जातील. (Navjot Singh Sidhu To Continue As Punjab Congress Chief Formal Announcement On Friday Harish Rawat)

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी गुरुवारी संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि पंजाब प्रभारी हरीश रावत यांची भेट घेतली आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांनी पूर्वी ज्या मुद्द्यांवर राजीनामा दिला होता त्याबद्दल माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  24 अकबर रोड (काँग्रेस मुख्यालय) येथे जवळपास सव्वा तास चाललेल्या बैठकीत पंजाब सरकार आणि पक्षाशीसंबंधीत मुद्द्यावर चर्चा झाली आणि एकमत करण्याचा प्रयत्न झाला जेणेकरून संपूर्ण निवडणुकीपूर्वी पक्ष एकत्र येऊ शकतो.

'राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर पूर्ण विश्वास'
नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्यात चर्चा झाली आहे. काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये वेळ लागतो… काँग्रेस अध्यक्षांचा निर्णय सर्वांना मान्य होईल, असे बैठकीनंतर हरिश रावत म्हणाले. तर पंजाब आणि पंजाबींशी संबंधित चिंता पक्ष हायकमांडला कळवल्या आहेत. माझा अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते जो निर्णय घेतील, तो काँग्रेस आणि पंजाबच्या हिताचा असेल. मी त्याच्या सूचनांचे पालन करेन, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

28 सप्टेंबरला दिला होता राजीनामा
28 सप्टेंबरला नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते की, ते पक्षाची सेवा करत राहतील. तसेच, पत्रात लिहिले होते की, "कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची घसरण तडजोडीने सुरू होते, मी पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंडाशी तडजोड करू शकत नाही." दरम्यान, काँग्रेस हायकमांडने नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही.

Web Title: Navjot Singh Sidhu To Continue As Punjab Congress Chief Formal Announcement On Friday Harish Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.