रोड रेज प्रकरणात दोषी आढळलेले पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू सध्या पटियाला मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आता त्यांना कारागृहात कामही देण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कठोर परिश्रमाचे काम न देता, क्लर्कचे काम देण्यात आले आहे. सुरुवातीच्य तीन महिन्याच्या प्रशिक्षण काळात त्यांना पगार मिळणार नाही. तर जाणून घेऊयात, सिद्धू यांना किती पगार मिळणार आणि त्यांना काय काम करावे लागेल यासंदर्भात...
जेलच्या नियमांप्रमाणे, सिद्धू यांना तीन महीने प्रशिक्षण दिले जाईल. या काळात पहिले 90 दिवस त्यांना पगार मिळणार नाही. या काळात, त्याला कारागृहाचे रेकॉर्ड कशा प्रकारे संकलित करावे हे शिकवले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला दिवसाला 40 रुपये ते 90 रुपयां दरम्यान मजदूरी मिळेल. त्याचा पगार त्याच्या कौशल्यावर निश्चित केला जाईल आणि त्याची कमाई त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
जेलमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत सिद्धू बरॅकमधूनच काम करतील. कारण ते एक हाय-प्रोफाईल कैदी आहेत. कारागृहातील फायली त्याला बरॅकमध्येच पाठवल्या जातील. कारण त्यांना त्यांच्या सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नसेल.
सिद्धू यांनी मंगळवारीच क्लर्क म्हणून काम करायलाही सुरुवात केली आहे. ते सकाळी 9 ते दुपारी 12 बजेपर्यंत आणि सायंकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत या दोन शिफ्टमध्ये काम करतील, असेही कारागृह अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.