Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंच्या मनात नक्की काय?; भगवंत मान यांचं कौतुक करत म्हणाले, "नव्या युगाची सुरूवात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 02:30 PM2022-03-17T14:30:49+5:302022-03-17T14:31:30+5:30
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आम आदमी पक्षाचे (AAP) नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जंगी सोहळ्यात पंजाबी भाषेत शपथ घेतली. शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलान या मूळ गावी झालेल्या या समारंभाला आपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. "मी एकही दिवस वाया न घालविता जनतेच्या हिताचे निर्णय घेईन. राज्यामधील बेकारी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी अथक प्रयत्न करेन," असं आश्वासन भगवंत मान यांनी जनतेला दिले. यानंतर, गुरूवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं कौतुक करत नव्या युगाची सुरूवात असल्याचं म्हटलं.
"तिच सर्वात नशीबवान व्यक्ती असते, ज्याच्याकडू कोणती अपेक्षा नसते. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये एक अँटी माफिया युगाची सुरूवात केली आहे. ते अपेक्षांची पूर्ताता करतील अशी आशा आहे आणि पंजाबला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणतील. लोकांना ध्यानात ठेवूनच ते धोरणं राबवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे," असं सिद्धू म्हणाले. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी हे ट्वीट केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
The happiest man is the one from whom no one expects … Bhagwant Mann unfurls a new anti - Mafia era in Punjab with a mountain of expectations …hope he rises to the occasion , brings back Punjab on the revival path with pro - people policies … best always
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 17, 2022
सिद्धूंचा राजीनामा
पंजाब काँग्रेसमधील जवळपास आठ महिन्यांच्या राजकीय नाट्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानंतर सिद्धूंनी ट्वीट करत जशी काँग्रेसच्या अध्यक्षांची इच्छा आहे, मी आपला राजीनामा पाठवला आहे, असं ट्वीट केलं होतं.
स्वीकारली मुख्यमंत्रीपदाची सूत्रं
पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आपने काँग्रेस व अन्य पक्षांचा दणदणीत पराभव केला होता. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्यात मान म्हणाले की, मी माझ्या कामाला लगेचच सुरुवात करणार आहे. उत्तम काम करण्यासाठी आधीच ७० वर्षे उशीर झाला आहे. या शपथविधीनंतर भगवंत मान यांनी चंदीगड येथे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली व कामाला प्रारंभ केला.