काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची दोन दिवसापूर्वी जेलमधून सुटका झाली आहे. दरम्यान, आता सिद्धु यांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. सिद्धु यांनी पहिलीच भेट आज मनसा येथील दिवंगत गायक सिद्धु मुसेवाला यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी आप सरकारवर टीका केली, तसेच लॉ अँड ऑर्डरवरही सवाल उपस्थित केले. ' सरकार गुन्हेगारांच्या सुरक्षेसाठी असते का? असा टोलाही लगावला.
नवज्योतसिंग सिद्धू दुपारी २.१५ च्या सुमारास मानसा येथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे काही नेतेही होते. क्रिकेटच्या जगातून राजकारणात प्रवेश केलेला नवज्योतसिंग सिद्धू गेल्या शनिवारीच पटियाला तुरुंगातून बाहेर आले. १९८८ मध्ये रोड रेज प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. १० महिन्यानंतर त्यांना आता बाहेर सोडण्यात आले आहे.
३६ जणांचा बळी, अखेर इंदूरमधील त्या मंदिरावर चालला बुलडोझर, प्रशासनाची कठोर कारवाई
मागील वर्षी सिद्धु मुसेवाला यांची हत्या झाली. मुसेवाला यांनी डिसेंबर २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी सिद्धु मुसेवाला यांनी युथ आयकॉन म्हटले होते.
गेल्या वर्षी पटियाला कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धु यांनी २० मार्च रोजी आत्मसमर्पण केले होते. नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात गेल्यानंतर काही दिवसांनी सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती.