Navjot Singh Sidhu :काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 1988 सालच्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. गेल्या 10 महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. सिद्धूने मित्रासोबत मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
निर्दोष, दोषी, निर्दोष, दोषी...या प्रकरणात सिद्धू यांची कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. पण हायकोर्टाने सिद्धूला 3 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर सिद्धूच्या वतीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिद्धूला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र मे 2018 मध्ये पीडितेच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली. यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने 19 मे 2022 रोजी सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.
काय प्रकरण आहे?27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू त्याचा मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावाले गेट मार्केटमध्ये होता. त्यावेळी सिद्धू हा क्रिकेटपटू होता आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वर्षभरापूर्वीच सुरुवात झाली होती. मार्केटमध्ये कार पार्किंगवरुन 65 वर्षीय गुरनाम सिंग याच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धूने गुरनाम सिंगला मारहाण केली. रुग्णालयात उपचारादरम्यान गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी कोतवाली पोलिस ठाण्यात सिद्धू आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिद्धूच्या पत्नीला स्टेज-2 कॅन्सर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 2 कर्करोगाचे निदान झाले आहे. पंजाबच्या माजी मंत्री असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी या आजाराचे निदान झाल्यानंतर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी पती नवज्योत सिंह सिद्धू यांना एक भावूक पत्र लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, नवज्योत सिंग सिद्धू एका अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत, जो त्यांनी केलेलाच नाही. मी दररोज तुमची बाहेर येण्याची वाट पाहत आहे. पण, मला आता माफ करा. तुमची वाट मी पाहू शकत नाही. कारण मला स्टेज-2 कॅन्सर आहे. आज सर्जरी होणार आहे. कोणाला दोष देणार, हीच देवाची मर्जी आहे, असे त्या म्हणाल्या.