Navjot Singh Sidhu: 'कायद्याचे पालन करणार', सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:12 PM2022-05-19T16:12:35+5:302022-05-19T16:12:46+5:30
Navjot Singh Sidhu: सुप्रीम कोर्टाने नवज्योत सिंग सिद्धूंना 1988 च्या ‘रोड रेज’ प्रकरणात एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Navjot Singh Sidhu road rage case: पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांचा मित्र कंवर सिंग संधूने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर आता सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
27 डिसेंबर 1988 मध्ये घडलेल्या रोडरेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयने आज निर्णय दिला. जस्टिस ए एम खानविलकर आणि जस्टिस एस के कौल यांच्या खंडपीठासमोर सुनावनी झाली. त्यांनी सिद्धूंना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर नवज्योत सिद्धूंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सिद्धूंनी ट्विट करत कायद्याचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे.
Will submit to the majesty of law ….
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 19, 2022
तत्पूर्वी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने सिद्धूला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात तीन-तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. पण, नंतर सर्वोच्च न्यायालयाने सिद्दूंची या आरोपातून मुक्तता केली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयानंतर मृताच्या नातेवाईकांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती. त्यावर निकाल देताना आज न्यायालयाने सिद्धूंना शिक्षा सुनावली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
27 डिसेंबर 1988 मध्ये ही घटना घडली होती. सिद्धूने पटियालामध्ये रस्त्याच्या मधोमध जिप्सी पार्क केली होती. या मार्गावरून मृत 65 वर्षीय व्यक्ती आणि अन्य दोघे बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सिद्धूला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. यातून वाद झाला. सिद्धू आणि त्याच्या सहकाऱ्याने त्या व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोप केला होता की, सिद्धू हे मारहाण करून पसार झाले होते.