नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:26 PM2022-04-12T18:26:17+5:302022-04-12T18:28:10+5:30

Navjot Singh Sidhu's Wife : नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना ट्विटद्वारे पत्नीच्या आजाराची माहिती दिली आहे.

Navjot Singh Sidhu’s wife hospitalised, to undergo surgery | नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती 

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती 

Next

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. पंजाब विधानसभा निवडणुकीत पराभव आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू  (Navjot Kaur Sidhu) या गंभीर आजारी आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना ट्विटद्वारे पत्नीच्या आजाराची माहिती दिली आहे. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू म्हटले आहे की,  पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. या ट्विटमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे की, "पत्नी गेल्या दोन दिवसांपासून गंभीर आजारी होती, काल तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन होणार आहे. लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना." दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या ट्विटला रिप्लॉय देताना काँग्रेस नेते सुखपाल सिंह खैरा यांनी ट्विट करून नवज्योत कौर सिद्धू यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नवज्योत कौर सिद्धू या माजी आमदार आहेत 
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या खूप प्रसिद्ध आहेत. 2012 मध्ये नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर पूर्व मतदारसंघातून आमदार होत्या. त्यांनी 2017 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी ही जागा सोडली होती. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणूकीत पती नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न बनवल्याने त्या काँग्रेसवर नाराज होत्या.

Web Title: Navjot Singh Sidhu’s wife hospitalised, to undergo surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.