ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.१२ - लवकरच येणारा 'नवरात्रौत्सव' लक्षात घेऊन 'डॉमिनोज' या आंतरराष्ट्रीय पिझ्झा कंपनीने आपल्या ५०० आऊटलेट्समध्ये केवळ 'शाकाहारी' पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. नवरात्रीच्या काळात अधिकाधिक शाकाहारी खवय्यांना आकर्षीत कऱण्यासाठी डॉमिनोजने ही योजना आणली आहे. त्यामुळे देशभरातील निवडक ५०० आऊटलेट्समध्ये नवरात्रीचे नऊ दिवस फक्त शाकाहारी पिझ्झा सर्व्ह करण्यात येईल.
येत्या १ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार असून त्या काळात उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील काही शहरातील 500 आउटलेट्समध्ये मांसाहारी पिझ्झा मिळणार नाही. नवरात्रीत अनेकांचा उपवास असतो, तेव्हा ग्राहक मांसाहाराचे सेवन करत नाहीत, हेच ध्यानात ठेऊन ही योजना आखण्यात आली आहे. त्याचसोबत पिझ्झा बेसही वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येणार आहे.