नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमाने हवाई दलाची ताकद वाढविण्यात महत्वाची भुमिका बजावणार असताना आता संरक्षण दलाच्या समितीने नौदल आणि लष्कराचीही ताकद वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
संरक्षण दलाच्या समितीची आज बैठक पार पडली. यामध्ये नौदलासाठी सहा नवीन पाणबुड्या तयार करण्यासाठी 40 हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तर लष्करासाठी शत्रूच्या रणगाड्यांना भेदणाऱ्या 5 हजार मिलान अँटी टँक मिसाईलच्या खरेदीसही मंजुरी दिली आहे.
यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार असून येत्या काळात सुसज्ज लष्कर देशाची रक्षा करणार आहे.