नक्षली-मोदी जोड
By admin | Published: May 09, 2015 1:44 AM
वाहतूक जाम शुक्रवारी दंतेवाडा येथे सुरक्षा एजन्सींनी पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यासह सराव केला. सकाळपासून अनेकदा सराव करण्यात आला. परंतु एसपीजीचे अधिकारी या सरावापासून संतुष्ट झाले नाही. त्यामुळे वारंवार सराव करण्यात आला. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने उतरतील तेथून अपंग मुलांची शाळा, सभास्थळ तसेच दंतेवाडा येथील नियोजित कार्यक्रम स्थळी हा ताफा नेण्यात ...
वाहतूक जाम शुक्रवारी दंतेवाडा येथे सुरक्षा एजन्सींनी पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यासह सराव केला. सकाळपासून अनेकदा सराव करण्यात आला. परंतु एसपीजीचे अधिकारी या सरावापासून संतुष्ट झाले नाही. त्यामुळे वारंवार सराव करण्यात आला. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने उतरतील तेथून अपंग मुलांची शाळा, सभास्थळ तसेच दंतेवाडा येथील नियोजित कार्यक्रम स्थळी हा ताफा नेण्यात आला होता. त्यामुळे बाहेरून दंतेवाडा मार्गे जगदलपूरकडे जाणाऱ्या वाहनांना रोखण्यात आले होते. सराव परिणामकारक होत नसल्याने तो वारंवार केला जात होता. परिणामी वाहतूक जाम झाली होती. तब्बल दोन-अडीच तास वाहतूक खोळंबल्याने लोकं ओरडू लागले होते. त्यामुळे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी तुंबलेला मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तब्बल दीड तास दमछाक करावी लागली.