नवी दिल्ली - डाव्या विचारांच्या नक्षलवादी कारवायांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची संख्या १२ वरून आाता ६ झाली असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. ३१ मार्च २०२६पर्यत देशातून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्याच्या दिशेने हे मोठे यश असल्याचे शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नक्षलवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत अथक प्रयत्नांतून सशक्त, सुरक्षित व समृद्ध भारताची निर्मिती करीत असल्याचे शाह यांनी नमूद केले. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी हा देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर याबाबत घोषणा करताना शाह यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या १२ ऐवजी केवळ ६ राहिल्याचे सांगून मोठे यश मिळवल्याचे म्हटले आहे.
वर्गवारीच्या अनुषंगाने जिल्ह्यांचा आढावाकेद्रीय गृह मंत्रालयानुसार, डाव्या विचारांच्या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कारवाया आणि हिंसाचार सुरू असून अशा जिल्ह्यांची सर्वात गंभीर तसेच दखल घेण्याइतपत प्रभाव असलेले जिल्हे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीच्या अनुषंगाने अशा जिल्ह्यांचा आढावा घेतला जातो.
गडचिरोलीसह सहा जिल्हेनक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांत महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगडमधील बिजापूर, कांकेर, नारायणपूर, सुकमा तसेच झारखंडमधील पश्चिम सिंहभूम या जिल्ह्याचा समावेश आहे.