छत्तीसगडमधील सुकमा-विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील टेकलगुडेम गावातील सीआरपीएफ कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले, तर १४ जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे हल्ल्याची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ३० जानेवारी रोजी सुकमा पोलीस स्टेशन जगरगुंडा परिसरात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षा शिबिर लावण्यात आले होते. शिबिरानंतर सीआरपीएफचे कोब्रा सैनिक जोनागुडा-अलिगुडा परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही माओवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात
सुरक्षा दलांचा वाढता दबाव पाहून माओवादी जंगलात पळून गेले. मात्र, या चकमकीत गोळी लागल्याने ३ जवान शहीद झाले आणि १४ जवान जखमी झाले. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे.