रायपूर : नक्षलवाद्यांनी दगडाच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात सीआयएसएफ जवान जखमी झाला असून, त्याच्याकडील वॉकी-टॉकी, मोबाईल फोन पळवला आहे. छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली.
किरांदूल व बचेली भागातील खाण परिसरात दोन जवान गस्त घालत असताना हा प्रकार घडला. सामान्य नागरिकांच्या पोशाखात आलेल्या नक्षलींजवळ धनुष्यबाण होते. त्यांनी जवानांना त्यांची वॉकी-टॉकी व फोन देण्यास सांगितले. जवानांनी नकार देताच जवानांच्या डोक्यात दगड मारले व वॉकी-टॉकी, मोबाईल फोन घेऊन पळ काढला. जवानांची आणखी कुमक घटनास्थळी येईपर्यंत नक्षली जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.