रायपूर - शनिवार, ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी (Naxals ) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले होते. या चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या जवानाबाबत आता नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून माहिती दिली आहे. (The Naxals called the journalist and told him about the one jawan is in their custody)बिजापूरमधील पत्रकार असलेल्या गणेश मिश्रा यांनी त्यांना नक्षलवाद्यांचा दोन वेळा फोन आल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, मला नक्षलवाद्यांचा दोनवेळा फोन आला आहे. त्यांनी एक जवान आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. या जवानाला गोळी लागली होती. त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. त्याची दोन दिवसांत सुटका केली जाईल. या जवानाचे फोटो आणि व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध केले जातील.
नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन, ताब्यात असलेल्या जवानाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 8:57 AM