नक्षलवाद्यांनी ३ एप्रिलच्या चकमकीनंतर अपहरण केलेल्या सीआरपीएफ कोब्रा कमांडोचा फोटो जारी केला आहे. ३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमकी झाली आणि त्यामध्ये २२ सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण केले. नंतर नक्षलवाद्यांनी हा मेसेज पाठवला होता की, कमांडो पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आज नक्षलवाद्यांनी कमांडो राजेश सिंग मनहासचा फोटो जाहीर केला आहे. फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. सीआरपीएफने राकेश्वर सिंग मनहासच्या चित्राबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, राकेश्वर यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट ठेवली.
या चित्रात राकेश्वर सिंग उत्तम प्रकारे निरोगी दिसत आहे. नक्षलवाद्यांनी हे चित्र काही आधी जाहीर केले होते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली आहे. नक्षलवाद्यांच्या या भूमिके मागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं
देशाला हदरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग मनहास या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला आहे. जवानाचा फोटो शेअर करताना तो सुरक्षित असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी त्यांनी एक अट ठेवल्याने खळबळ माजली आहे.