NCB आणि भारतीय नौदलाने ड्रग्सविरोधात कोची किनारपट्टीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एका इराणी बोटीतून अमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत बोटीत असलेल्या लोकांनाही ताब्यात घेण्यात आले.
एक निवेदन जारी करताना एनसीबीने सांगितले की, भारतीय नौदलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत कोची किनारपट्टीवरील इराणी बोटीतून 200 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील 6 क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबईत डीआरआयची कारवाईतिकडे, मुंबईत डीआरआयने आंतरराष्ट्रीय विमानतळावर 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले. डीआरआय मुंबईच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ड्रग्ज लपवण्यासाठी ट्रॉलीच्या वॅगमध्ये बनावट पोकळी बनवली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे बुधवारी एका प्रवाशाला रोखण्यात आले आणि त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अंमली पदार्थ सापडला. हेरॉईन एका ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. केरळमधील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.