राष्ट्रवादीने मागविले अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे प्रोसिडिंग अपात्रतेची कारवाई सुरू : काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकार्यांनी अहवाल मागविला
By admin | Published: March 23, 2017 5:19 PM
जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत तीन सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांकडे पत्र देत निवडीच्या प्रोसिडिंगची मागणी केली आहे. काँग्रेस सदस्यांच्या भूमिकेसंदर्भात प्रदेश कार्यकारिणीने अहवाल मागविला आहे.
जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत तीन सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांकडे पत्र देत निवडीच्या प्रोसिडिंगची मागणी केली आहे. काँग्रेस सदस्यांच्या भूमिकेसंदर्भात प्रदेश कार्यकारिणीने अहवाल मागविला आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवार २१ रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपाच्या उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर राहिले होते. तर काँग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेेनेच्या उमेदवाराचा पराभव होऊन नामुष्कीचा सामना करावा लागला होता.राष्ट्रवादी गटनेत्यांचे प्रोसिडिंगसाठी पत्रजि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिल्याने गटनेते शशीकांत साळुंखे यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना पत्र देत निवडणुकीच्या वेळी तयार केलेले प्रोसिडिंग तसेच व्हीडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली आहे.जि.प.सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईला वेगराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या घटनाक्रमाचा अहवाल राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. जिल्हाधिकार्यांकडून निवडीचे प्रोसिडिंग प्राप्त झाल्यानंतर या तिन्ही सदस्यांना अपात्र करावे या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत सदस्यांना अपात्र करावे असा कायदा असल्याने त्याचा आधार घेण्यात येणार आहे.अपघाताच्या चौकशीची मागणीगैरहजर राहणार्या जि.प.सदस्याचा एकाच वेळी अपघात कसा झाला ? हे तिन्ही सदस्य जळगाव सोडून एकाच वेळी कोणत्या कामासाठी गेले होते? यासार्याची चौकशी करावी या मागणीचे पत्रदेखील पोलिसांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेस पाठविणार प्रदेश कार्यकारिणीला अहवालकाँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपाला दिलेल्या पाठिंब्या संदर्भात जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडून प्रदेश सरचिटणीस ॲड.गणेश पाटील यांनी अहवाल मागविला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा घटनाक्रमाचा एकत्रित अहवाल त्यांच्याकडून प्रदेश काँगे्रसला पाठविण्यात येणार आहे.कोटजिल्हाधिकार्यांकडून प्रोसेडिंग प्राप्त झाल्यानंतर तिन्ही सदस्यांच्या अपात्रतेची प्रक्रिया करण्यात येईल. तिन्ही सदस्यांचा एकाच वेळी अपघात कसा झाला याच्या चौकशीसाठी पोलिसांना पत्र देण्यात येईल.डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.कोटराष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य एकसंघ नव्हते. त्यांना आपले घर सांभाळता आले नाही. त्यामुळेत्यांनीकाँग्रेसने विश्वासघातकेलाअसाआरोपकरूनये.बीडवबुलढाणायेथेराष्ट्रवादीनेभाजपालामदतकेलीआहेहेत्यांनीविसरूनये.-ॲड.संदीपपाटील,जिल्हाध्यक्ष,काँग्रेस.