शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

चीनसोबतचा तणाव वाढला असताना मोदी सरकारकडून शरद पवारांना महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:42 PM

खासदारकीची शपथ घेताच मोदी सरकारकडून शरद पवारांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली: राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली. यानंतर लगेचच शरद पवारांवर केंद्र सरकारनं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर पवारांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला चीनसोबतचा तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांकडे सोपवण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.चीनकडून सातत्यानं सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे पूर्व लडाखमध्ये तणाव वाढला आहे. गेल्याच महिन्यात गलवानमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली. त्यावेळी पवारांनी संरक्षण करारांचा दाखला देत सरकारवर थेट टीका करणं टाळलं. त्यांनी भूतकाळात झालेल्या घटनांचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राहुल यांच्या टीकेची धार बोथट केली. शरद पवारांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांचा हा अनुभव पाहता त्यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीचं सदस्यत्व देण्यात आल्याचं बोललं जात आहे.भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सहस्त्रबुद्धे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांसोबतच काँग्रेस खासदार राजीव सातव यांनाही संरक्षण समितीत स्थान देण्यात आलं आहे.कोणाला कोणती कमिटी?उदयनराजे भोसले, भाजपा- रेल्वे कमिटीप्रियांका चतुर्वेदी, शिवसेना- कॉमर्स कमिटीडॉ. भगवान कराड, भाजपा- पेट्रोलियम कमिटीज्योतिरादित्य सिंधिया, भाजपा- एचआरडी कमिटीरंजन गोगोई- परराष्ट्र विषयक कमिटी  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधी