शिमला नाही, जयपूरही नाही या ठिकाणी होणार विरोधकांची बैठक, शरद पवारांनी तारीख केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 06:06 PM2023-06-29T18:06:08+5:302023-06-29T18:07:21+5:30
१५ विरोधी पक्ष मोदी सरकार विरोधात मैदानात उतरले आहेत.
भाजप सरकार देशभरातील विरोधी पक्ष आता एकत्र आले आहेत. देशांतील १५ विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षांची पहिली बैठक बिहारमधील पाटना येते झाली. आता काही दिवसातच दुसरी बैठक होणार आहे, ही बैठक अगोदर शिमल्यात होणार असल्याचे बोलले जात होते तर सकाळी जयपूरमध्ये होईल असं सांगितलं जात होतं. आता या बैठकी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपडेट दिली आहे.
होय, आमची बैठक झाली होती, पण...; पहाटेच्या शपथविधीवरुन आता शरद पवारांचा गौप्यस्फोट
आता पुढची बैठक शिमल्याऐवजी बेंगळुरूमध्ये होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. १३ आणि १४ जुलै रोजी विरोधी पक्षांचे नेते बेंगळुरूमध्ये एकत्र येणार आहेत.
शरद पवार म्हणाले, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना गेल्या निवडणुकीत यश मिळालेले नाही. केरळ, आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमध्येही भाजपची सत्ता नाही. देशातील बहुतांश राज्यात भाजपची सत्ता नाही. काही राज्यात आहेत. उदाहरणार्थ, गोव्यात काँग्रेसने बहुसंख्य आमदार फोडून सत्ता मिळवली.
'भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूरमध्ये ४५ दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाही, असा सवाल निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केला. दुसरी चिंतेची बाब म्हणजे जातीय हिंसाचार वाढवून जातीय वातावरण निर्माण करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न. गेल्या पाच-सहा महिन्यांत या दंगली झाल्या आहेत. पंतप्रधान अमेरिकेत आहेत आणि पाटण्याला मीटिंग आहे हे कळताच त्यांनी वैयक्तिक हल्ले करायला सुरुवात केली. १३ आणि १४ जुलै रोजी बेंगळुरूमध्ये सर्वपक्षीय बैठक होणार आहे. शिमल्यात मुसळधार पावसामुळे निर्णय बदलण्यात आला आहे, असंही शरद पवार म्हणाले.