नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींचा उल्लेख अडाणी आणि सडकछाप माणूस असा केला आहे. माजिद मेमम मोदींवर टीका करताना म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचे पद घटनात्मक पद आहे. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच जनता थेट पंतप्रधानाची निवड करत नाही. तर जनतेकडून निवडलेले खासदार पंतप्रधानाची निवड करतात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.''
नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस, माजिद मेमन यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:05 IST