राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्याच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे दौरे नियोजित होते. परंतु आता हे दौरे रद्द करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान नुकतंच पार पडलं. १ एप्रिल पासून शरद पवार हे तीन दिवसांकरिका पश्चिम बंगालमध्ये प्रचासाठी जाणार होते. यापूर्वी काँग्रेसनं शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी प्रचार करू नये अशी विनंती केली होती. परंतु काँग्रेसची विनंती फेटाळत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल; पश्चिम बंगालसह सर्व दौरेही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:56 AM
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि केरळचे दौरे होते नियोजित, पुढील सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची राष्ट्रवादीची माहिती
ठळक मुद्देनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि केरळचे दौरे होते नियोजितपुढील सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची राष्ट्रवादीची माहिती