नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासह तब्बल 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बैठक मंगळवारी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 6 जनपथ, नवी दिल्ली येथे होईल. तत्पूर्वी, शरद पवार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. (NCP leader Sharad Pawar and opposition meeting in Delhi which leaders will be present at the meeting)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. हे सर्व विरोधक राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली एकत्रित येणार असल्याचेही समजते. तसेच सर्व विरोधकांना एकत्र आणणे हाच शरद पवार यांचा अजेंडा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचा हा पहिला प्रयत्न नाही, दिल्लीतील बैठकीवर नानांचं स्पष्ट मत
शरद पवारांबरोबरच्या बैठकीत 'हे' नेते होणार सहभागी - शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला नेमके कोण-कोण नेते उपस्थित राहणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यांत, फारुख अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, संजय सिंग, पवन वर्मा, डी. राजा, न्यायमूर्ती ए. पी. सिंग, जावेद अख्तर, प्रितीश नंदी, के. टी. एस. तुलसी, करण थापर, वंदना चव्हाण, एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंग, आषुतोश, माजिद मेमन, मनोज झा, सुरेंद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, घनश्याम तिवारी आणि अरुण कुमार, हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बरोबर, पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशीही फोनवरून बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिमतः, या बैठकीत नेमके कोण-कोणते राजकीय पक्ष सहभागी होणार, हे उद्या बैठकीवेळीच स्पष्ट होईल.
शदपवारांचा हा पहिलाच प्रयत्न नाही -शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीबाबत बोलताना, पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या-ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात नवीन काही आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
“सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा”: नवाब मलिक
यूपीए की तिसरी आघाडी?शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचे नेतृत्त्व करावे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.