Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: “अर्थसंकल्प पूर्णपणे वाईट आहे असे म्हणता येणार नाही, पण...”; अमोल कोल्हेंची सावध प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:28 PM2023-02-01T14:28:50+5:302023-02-01T14:30:03+5:30
Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: आधीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या, त्याचे काय झाले, अशी विचारणा खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या या कार्यकाळाचा पूर्णवेळ शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करसवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर काही गोष्टी महाग, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली.
सर्वसामान्य जनतेला सवलत देण्यात आली. तशी सवलत मोठ्या उद्योजकांनाही देण्यात आली आहे. असा एक सूर आहे. तसेच अनेक गोष्टींबाबत आणखी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. मात्र, तसे ते देण्यात आलेले नाही. भारतीय रेल्वेत खासगी गुंतवणूक केली जाणार आहे. पण नेमके काय केले जाणार आहे, याबाबत स्पष्टीकरण देणे अतिशय गरजेचे होते, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्प पूर्णपणे वाईट आहे, असे नाही
केंद्रीय अर्थसंकल्प पूर्णपणे वाईट आहे, असे म्हणता येणार नाही. पण, यापूर्वीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत, या योजनांसंदर्भातील बाबींचा लेखाजोखा मांडला गेला असता, तर त्यात सकारात्मकता दिसली असती, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील मोठा वर्ग असलेल्या अल्पसंख्यांकांचा उल्लेखही या बजेटमध्ये करण्यात आलेला नाही. अनेक गोष्टींची सवलत देत असताना, त्याच त्याच योजना पुन्हा राबवत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात त्या योजनांचे फलित काय, हे त्यातून स्पष्ट होत नाही. निवडणुका डोळ्यासमोर सादर केलेल्या बजेटमधून वेगळे काही मिळेल, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"