शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे घोडे अडले

By admin | Published: September 24, 2014 4:25 AM

शिवसेना आणि भाजपा महायुतीचे जागावाटप मुख्यमंत्रिपदावरून अडले होते, अशी चर्चा असताना, काँग्रेस आघाडीत याच विषयावरून रस्सीखेच सुरू आहे

नाशिक : शिवसेना आणि भाजपा महायुतीचे जागावाटप मुख्यमंत्रिपदावरून अडले होते, अशी चर्चा असताना, काँग्रेस आघाडीत याच विषयावरून रस्सीखेच सुरू आहे. सत्ता आल्यास राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे, त्यातून चर्चा रखडली आहे. काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीत तणाव निर्माण झाला होता. युती तुटणार म्हणता म्हणता राहिली. अंतस्थ हा वाद जागांपेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी असल्याचे सांगितले जात होते; परंतु अशाच पद्धतीने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने ज्या तीन मागण्या केल्या आहेत त्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे कॉँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला १२४ जागा देण्यास तयार आहे; परंतु राष्ट्रवादीला १४४ जागा हव्या आहेत. तसेच ज्या अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्यासाठीही जागा सोडाव्यात, अशी मागणी असल्याचे राणे यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू आहे. चर्चेत काय मुद्दे मांडायचे हे हायकमांडने सांगितले असून, त्यानुसारच चर्चा सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)