रघुनाथ पांडे, नवी दिल्लीभूसंपादन कायद्यातील सुधारणांसाठी लोकसभेत मांडलेल्या विधेयकावरून राजधानीतील वातावरण तापत असतानाच ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला आहे.भूसंपादन अध्यादेश व या कायद्यातील सुधारणा या विषयावर सरकारची बाजू मांडण्यास संसदेच्या आवारातील बालयोगी सभागृहात सासंदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी एनडीएतील घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते, खा. आनंदराव अडसूळ आणि खा. संजय राऊत उपस्थित नव्हते. अडसूळ प्रकृतीच्या कारणाने तर गिते मुंबईला गेल्याने उपस्थित राहिले नाहीत. शिवसेनेची भूमिका नेहमीच शेतकरीहिताची असून, हा अध्यादेश शेतकरीविरोधी असल्याने आपण जाण्याचे टाळले, असे खा. राऊत म्हणाले.
‘एनडीए’तच मतभेद!
By admin | Published: February 25, 2015 2:48 AM