शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
2
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
4
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
5
नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
6
जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज
7
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
8
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
9
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांची बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
10
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
11
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
12
पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त
13
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
14
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
15
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
16
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय
17
उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू
18
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
19
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
20
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

NDA- INDIA एनडीए-इंडिया आघाडी पुन्हा आमने-सामने; सात राज्यांत विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:25 AM

NDA-INDIA alliance faces off again; By-elections for 13 Assembly seats in seven states : भाजपने तिघांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे.

 हरीश गुप्ता नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला टप्पा ३ जुलै रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या १३ जागांसाठी १० जुलै रोजी सात राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत प्रतिष्ठेची पोटनिवडणूक होत असून तेथे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर देहरामधून निवडणूक लढवत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत अभिषेक मनू सिंघवी (काँग्रेस) यांचा पराभव झाला होता. भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर दोन अपक्षांनी राजीनामा दिल्याने हमीरपूर आणि नालागढ जागांसाठीही मतदान होणार आहे. भाजपने तिघांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे.

पोटनिवडणूक कशामुळे?

विधानसभेच्या या पोटनिवडणुका विद्यमान सदस्याच्या मृत्युमुळे किंवा आमदाराने राजीनामा दिल्याने रिक्त जागांवर होत आहेत. काही आमदारही खासदार झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले. या पोटनिवडणुका बिहार (१), हिमाचल प्रदेश (३), मध्य प्रदेश (१), पंजाब (१), तामिळनाडू (१), उत्तराखंड (२) आणि पश्चिम बंगाल (४) अशा होणार आहेत.

पंजाबमध्ये सर्वांची परीक्षालोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर जालंधर पश्चिम (एससी) पोटनिवडणूक पंजाबमध्ये सत्ताधारी आपसाठी परीक्षा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपने या राज्यात तीन जागा जिंकल्या तर, काँग्रेसने सात आणि शिरोमणी अकाली दलाने एक व दोन जागा इतरांना मिळाल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल शिरोमणी अकाली दल-भाजपला एकत्र येण्यास भाग पाडू शकतात. कारण, त्यांना ३२ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला २६.३० टक्के आणि आपला २६.०२ टक्के मते मिळाली.  

टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी