"NDA म्हणजे नो डाटा अव्हेलेबल", नावाचा नवा अर्थ सांगत शशी थरूर यांनी मोदी सरकारला लगावला टोला
By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 12:17 PM2020-09-22T12:17:31+5:302020-09-22T12:24:51+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती.
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव, चीनची घुसखोरी, कृषिविषयक विधेयके यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. केंद्रातील एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल, असे नामकरण थरूर यांनी केले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरून यांनी यासंदर्भातील एक कार्टुनसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात ते म्हणतात . या सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. महसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. कोरोनामुळे् झालेल्या मृत्यूंचा संशयास्पद आकडा, जीडीपीच्या वाढीबाबतची गोंधळ वाढवणारी आकडेवारी, यामधून सरकारने आपल्या एनडीए या नावाला नवा अर्थ दिला आहे. तो म्हणजे नो डाटा अव्हेलेबल.
No #data on migrant workers, no data on farmer suicides, wrong data on fiscal stimulus, dubious data on #Covid deaths, cloudy data on GDP growth — this Government gives a whole new meaning to the term #NDA! pic.twitter.com/SDl0z4Hima
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 22, 2020
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झालेल्या मजुरांच्या संदर्भातील आकडेवारी ही सरकारकडे उपलब्ध नाही आहे. संगिता कुमारी देव, भोला सिंह, कलानिधी वीरस्वामी आणि काही अन्य सदस्यांनी लॉकडाऊन दरम्यान हजारे मजुरांचा मृत्यू झाला आहे का आणि जर झाला असेल तर त्याचे विवरण द्या, अशी मागणी केली होती.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, श्रमिकांचे झालेले मृत्यू सर्वांनी पाहिले आहेत. मात्र सरकारला याची माहिती मिळाली नाही, असा टोल राहुल गांधींनी लगावला. मोी सरकारला लॉकडाऊनदरम्यान, किती प्रवासी मजुरांचा मृ्त्यू झाला आणि किती नोकऱ्या गेल्या याची माहिती नाही, असा टोला लगावला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी