नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव, चीनची घुसखोरी, कृषिविषयक विधेयके यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. केंद्रातील एनडीए म्हणजे नो डाटा अव्हेलेबल, असे नामकरण थरूर यांनी केले आहे.काँग्रेस खासदार शशी थरून यांनी यासंदर्भातील एक कार्टुनसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहे. त्यात ते म्हणतात . या सरकारकडे स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्य आत्महत्येसंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. महसुलासंदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही. कोरोनामुळे् झालेल्या मृत्यूंचा संशयास्पद आकडा, जीडीपीच्या वाढीबाबतची गोंधळ वाढवणारी आकडेवारी, यामधून सरकारने आपल्या एनडीए या नावाला नवा अर्थ दिला आहे. तो म्हणजे नो डाटा अव्हेलेबल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी