NDA New Partner In South India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला (BJP) तामिळनाडूमध्ये नवा राजकीय साथीदार मिळाला आहे. जीके वासन (G. K. Vasan) यांच्या नेतृत्वाखालील तमिळ मनीला काँग्रेस (TMC) एनडीएत सामील झाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, तमिळ मनिला काँग्रेसने राज्यातील आणखी अनेक पक्ष एनडीएमध्ये सामील होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपच्या प्रदेश युनिटनेही वासन यांचे कौतुक केले आणि आगामी काळात युतीला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला जाईल असे सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणारजीके वासन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ते 27 फेब्रुवारी 2024 रोजी तिरुपूर जिल्ह्यातील पल्लडम येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. आज देशाची आर्थिक वाढ आणि सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. गरिबांचे उत्थान अधिक महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनणार आहोत. हे सर्व लक्षात घेऊन टीएमसीला असे सरकार हवे आहे, एक पंतप्रधान हवा आहे जो प्रत्यक्षात हे सर्व साध्य करू शकेल. भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या निर्णयामागील कारण म्हणजे एक मजबूत आणि समृद्ध भारत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मोदींचे कौतुक केलेजीके वासन यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकात विविध क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, तामिळ मनिला काँग्रेस एनडीएचा एक भाग म्हणून भाजपच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढवेल. 'समृद्ध तामिळनाडू, सशक्त भारत' असा आमचा नारा असेल. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशात आर्थिक समृद्धी येईल आणि देशातील गरिबी कमी होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
अशी झाली पक्षाची सुरुवातदिवंगत नेते जीके मूपनार यांनी निवडणुकीसाठी AIADMK सोबत युती करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस सोडून 1996 मध्ये TMC ची स्थापना केली होती. मात्र, 2002 मध्ये त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. यानंतर त्यांचे पुत्र जीके वासन यांनी 2014 मध्ये पुन्हा काँग्रेसशी संबंध तोडले आणि टीएमसीची पुनर्स्थापना केली.