विरोधी ऐक्याचे 'INDIA' नाव ठेवल्यामुळे नवा वाद; 26 पक्षांविरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:46 PM2023-07-19T19:46:15+5:302023-07-19T19:46:51+5:30

विरोधी ऐक्याचे नाव I.N.D.I.A ठेवण्यात आले आहे. यावरुन नवा वाद सुरू झाल आहे.

NDA vs INDIA: Police complaint against 26 Opposition parties for improper use of the name of INDIA | विरोधी ऐक्याचे 'INDIA' नाव ठेवल्यामुळे नवा वाद; 26 पक्षांविरोधात तक्रार दाखल

विरोधी ऐक्याचे 'INDIA' नाव ठेवल्यामुळे नवा वाद; 26 पक्षांविरोधात तक्रार दाखल

googlenewsNext

NDA vs INDIA: काल(दि.18) बंगळुरुमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीत विरोधी आघाडीचे I.N.D.I.A. ठेवण्यावर एकमत झाले. पण, आता याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील बाराखंबा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून, I.N.D.I.A. नाव ठेवणे हे Emblems कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. 

दिल्लीतील रहिवासी डॉ. अविनाश मिश्रा यांनी ही तक्रार दिली आहे. कायद्यांतर्गत भारताचे नाव कोणीही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरू शकत नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे बोलले जात आहे. 26 राजकीय पक्षांनी देशाच्या नावाचा गैरवापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तकार्रीत बंगळुरू येथे झालेल्या बैठकीचा भाग असलेल्या सर्व 26 विरोधी पक्षांची नावे आहेत.

विरोधी ऐक्याचे नवीन नाव
विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. नाव दिले आहे. याचा अर्थ इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स आहे. आघाडीचे नाव I.N.D.I.A. आणि टॅगलाइन जीतेगा भारत ठेवण्यात आली आहे. 

Emblems कायदा काय आहे?

प्रतीक(Emblems act) कायद्याला 'प्रतिक आणि नावे (अयोग्य वापर) कायदा' असे म्हणतात. कायद्यानुसार, चिन्ह आणि नावांचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय चिन्हांचे संरक्षण करण्यासाठी या कायद्याचा वापर होतो. या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा यांसारख्या काही विशेष चिन्हांचे संरक्षण केले जाते. 

Web Title: NDA vs INDIA: Police complaint against 26 Opposition parties for improper use of the name of INDIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.