शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 7:58 AM

१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी

- संजय शर्मानवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या महागठबंधनाला उत्तर देण्यासाठी व एनडीएची ताकद आणखी वाढविण्यासाठी १८ जुलै रोजी दिल्लीत एनडीएची मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. एनडीएच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात या बैठकीकडे पाहिले जात आहे.

एनडीएच्या या शक्तिप्रदर्शनात अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिरोमणी अकाली दल, तेलुगू देसम पार्टी, लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, राष्ट्रीय लोक जनता दलाचे उपेंद्र कुशवाह, सुभासपाचे ओमप्रकाश राजभर यांच्यासह अन्य राजकीय पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे २०२४च्या तयारीच्या रोड मॅपवर काम करीत आहे. विरोधकांच्या १८ राजकीय पक्षांच्या महागठबंधनला उत्तर देण्यासाठी त्यांच्या तुलनेत आपली शक्ती वाढविण्यासाठी अन्य पक्षांना एनडीएमध्ये सहभागी करण्याच्या रणनीतीवर काम करीत आहे.

बैठकीला कोण येणार?१८ जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये एनडीएची मोठी बैठक होईल. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिरोमणी अकाली दल, तेलुगू देसम पार्टी, लोजपा चिराग पासवान गट, सुभासपा नेते ओमप्रकाश राजभर, रालोजदचे कुशवाह यांना औपचारिकरीत्या एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यात येईल.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे हेच ध्येय...बैठकीत संघटना मजबूत करणे आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदींना सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून सत्तेत आणणे, हे आमचे लक्ष्य आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. भाजप केवळ निवडणुकीपूर्वीच तयारी करत नाही तर वर्षभर लोकांच्या संपर्कात राहतो, असे भाजपच्या आसाम युनिटचे प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले.

१२ राज्यांतील १४२ जागांवर लक्षआगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पूर्व आणि ईशान्य भारतातील १२ राज्यांतील १४२ जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी येथे बैठक झाली. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, हिमंता विश्व शर्मा, माणिक साहा, खासदार, आमदार उपस्थित होते. १२  राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण १४२ जागा आहेत, त्यापैकी २०१९ मध्ये भाजपने ६८ जागा जिंकल्या होत्या. या १४२ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी घडामोडी२० जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एनडीएची ही बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या बैठकीत एनडीएच्या नेत्यांना डिनर देणार आहेत.महाराष्ट्रातील राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट आधीपासूनच भाजपबरोबर युतीत आहे. बिहारमध्येही चिराग पासवान व उपेंद्र कुशवाह हे एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत. आंध्र प्रदेश व तेलंगणामधील तेलुगू देसम पार्टीही यात सहभागी होणार आहे. उत्तर प्रदेशातील अपना दल आधीपासूनच एनडीएमध्ये आहे. सुभासपाही सहभागी होऊ शकते. अशाच प्रकारे पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचे भाजपशी जुनी युती होती. शेतकरी आंदोलनामुळे ती तुटली होती. आता दोन्ही पक्ष पुन्हा पंजाबमध्ये मिळून निवडणूक लढवू शकतात.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार