उत्तरकाशी येथील बोगद्यात गेल्या ११ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आज बुधवारी सायंकाळी उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली. या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये एनडीआरएफचे जवान ऑक्सिजन सिलिंडर घेऊन उत्तरकाशीच्या सिलकियारा बोगद्यात बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसत आहे. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ४५ मीटर पाईप खोदण्याचे काम बचाव कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले आहे. कर्मचारीही दोरी आणि स्ट्रेचरसह बोगद्याच्या आत जाताना दिसत आहेत. आता अडकलेल्या मजुरांना लवकरच बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेनं हाणून पाडला खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशारा
पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी बुधवारी सांगितले होते की, पुढील टप्प्याचे काम दोन तासांत सुरू होईल. खुल्बे हे सध्या उत्तराखंड पर्यटन विभागात विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. 'मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, आम्ही जे काम गेल्या १ तासापासून करत होतो, त्यामध्ये आम्ही अमेरिकन ऑगर मशीनने आणखी ६ मीटर लांबीचे ड्रिल केले आहे. मला आशा आहे की पुढील टप्प्याचे काम येत्या २४ तासांत सुरू होईल.
बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपैकी गब्बर सिंग नेगी आणि सबा अहमद हे इतरांचे मनोबल वाढवत असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. सर्व मजुरांचे मनोबल उंचावेल यासाठी योगासने यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत आहे. या मजुरांनी ११ दिवसांपासून सूर्यप्रकाशही पाहिलेला नाही. या मजुरांना पाईपद्वारे अन्न पुरवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कामगारांना रोज गरम जेवण दिले जात आहे.