शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 05, 2020 5:26 PM

“अर्णब यांचे घर पाहून मी अवाक झालो. रोज 6000 शब्द टाईप करून मी गाझियाबादच्या त्या घरात राहतो, ज्यात खुर्ची लावण्यासाठीही बालकनी नाही. अर्णब यांचे घर किती सुंदर आहे. अर्णब यांच्या सुंदर घराच्या व्हिजुअलसमोर, मी...

ठळक मुद्देरिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.अनेकांनी ही कारवाई म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.अर्णब यांचे घर पाहून तर वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार अवाक झाले.

नवी दिल्ली - रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. रायगड पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. यानंतर अनेक स्थरांतून, पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी ही कारवाई म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.

अर्णब यांच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर जबरदस्त गोंधळ झाला. अर्णब घरातून निघण्यास तयार नव्हते. तर पोलीस त्यांना नेण्यासाठी अडले होते. यावेळी अर्णब यांची पत्नी आणि मुलं मोबाईलच्या सहाय्याने संपूर्ण घटनेचे शूटिंग करत होते. यादरम्यान, अर्णब यांच्या घरातील 'नजारा'ही जनतेने पाहिला. अर्णब यांचे घर पाहून तर वरिष्ठ पत्रकाररवीश कुमार (Ravish Kumar) अवाक झाले. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. 

अर्णब गोस्वामी प्रकरणात रविश म्हणाले, ‘ जुने प्रकरण पुन्हा का ओपन करण्यात आले? हे पोलिसांनी स्पष्ट करायला हवे. जेणेकरून, अर्णब यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच अटक करण्यात आली, हे लोकांना कळू शकेल.’ रवीश कुमार म्हणाले,  प्रत्येकजण अर्णबच्या बाजूने उभे आहे. मात्र, अर्णब यांनी असे कधीच केले नाही.

रवीश म्हणाले, ‘अर्णब यांची पत्रकारीता 'रेडियो रवांडा'चे उदाहरण आहे. ज्याच्या 'उद्घोषकाने' जनतेला चिथावणी दिली आणि लाखो लोक मारले गेले. अर्णब यांनी कधीच मॉबच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांची बाजू घेतली नाही. गेल्या चार महिन्यांपासून ते जे करत आहेत, त्यावर न्यायालयांनीही भाष्य केले आहे. तेव्हा कोणताही मंत्री, न्यायालय अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर हल्ला करत आहे, असे का म्हणाला नाही? असा सवालही रविश यांनी केला.

रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये अर्णब यांच्या घराचा उल्लेख करत लिहिले आहे, “अर्णब यांचे घर पाहून मी अवाक झालो. रोज 6000 शब्द टाईप करून मी गाझियाबादच्या त्या घरात राहतो, ज्यात खुर्ची लावण्यासाठीही बालकनी नाही. अर्णब यांचे घर किती सुंदर आहे. अर्णब यांच्या सुंदर घराच्या व्हिजुअलसमोर, मी असंघटित क्षेत्रातील एका मजुराप्रमाणे चुपचाप उभा राहिलो. 

अर्णब गोस्वामी जेव्हा कारागृहातून घरी येतील, सर्वप्रथम तर पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर सोडावे. मी तर असेच म्हणेल, की काही दिवसांची सुट्टी घेऊन त्यांनी आपल्या या सुंदर घराचा आनंद घ्यावा. जर ते या घराचा आनंद घेऊ शकत नसतील, तर त्यांनी पाहुना म्हणून मला आमंत्रण द्यावे. मी काही दिवस तेथे थांबेन. सकाळी त्यांच्या घरची कॉफी घेईन. तसे तर माझ्या घरी मी चहाच पितो. पण, आपण जेव्हा श्रीमंताच्या घरी जाता तेव्हा आपली टेस्ट बदलावी. त्यांच्या घराच्या बालकनीत बसून अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याला सलाम पाठवीन आणि बॉर्डर चित्रपाटाचे गाणे फुल व्हॉल्यूममध्ये ऐकायला आवडेल. "ऐ जाते हुए लम्हों, जरा ठहरो, जरा ठहरो…. मैं भी चलता हूं... जरा उनसे मिलता हूं... जो इक बात दिल में है उनसे कहूं तो चलूं तो चलूं….वाचा रविश यांची संपूर्ण पोस्ट -

मैं आज क्यों लिख रहा हूं, अर्णब की गिरफ्तारी के तुरंत बाद क्यों नहीं लिखा? आत्महत्या के लिए उकसाने का मामला संगीन है...

Posted by Ravish Kumar on Wednesday, November 4, 2020
टॅग्स :Ravish Kumarरवीश कुमारarnab goswamiअर्णब गोस्वामीJournalistपत्रकार