नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या नीट परीक्षेसंबंधी वटहुकुमावर तातडीने सुनावणी करीत अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात स्वत:च्या स्वतंत्र परीक्षा कायम ठेवण्याची राज्यांना मुभा देत त्यांना नीटच्या अखत्यारीत न आणण्यासंबंधी वटहुकुमाला इंदूरचे डॉक्टर आनंद राय यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. मध्य प्रदेशच्या बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यात व्हिसलब्लोअरची भूमिका बजावल्यामुळे राय यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.या प्रकरणी उन्हाळी अवकाशानंतर सुनावणी होऊ द्या. विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात निश्चितता असावी. आणखी संभ्रमाची भर घातली जाऊ नये. केंद्र सरकारने आणलेला वटहुकूम केवळ वर्षभरापुरता आहे, असे पी.सी. पंत आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने त्वरित सुनावणीला नकार देताना स्पष्ट केले.नव्याने याचिका‘नीट’बाबत सर्वोच्च न्यायालयात मुद्दा लावून धरणाऱ्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने शुक्रवारी नव्याने याचिका दाखल करीत वटहुकुमाला आव्हान दिले. वटहुकूम मूलभूत अधिकाराच्या विसंगत असल्याचा दावा या संस्थेने केला आहे.
‘नीट’ वटहुकुमाला तूर्त स्थगिती नाही
By admin | Published: May 28, 2016 1:47 AM