नवी दिल्ली : नव्याने स्थापन केलेल्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ व ‘जेईई’सह अन्य देशपातळीवरील प्रवेश परीक्षा ‘आॅनलाइन’ नव्हे तर फक्त संगणकावर आधारित पद्धतीने घेण्यात येतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी दिले.लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जावडेकर म्हणाले, परीक्षार्थींना ‘एनटीए’च्या संकेतस्थळावरून संबंधित परीक्षेची उत्तरपत्रिका डाऊनलोड करून घेऊन माऊसच्या साह्याने त्यात उत्तरे भरावी लागतील.काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शन न मिळणे किंवा ऐनवेळी ते बंद होणे अशा समस्या सध्या आहेत. शिवाय पहिल्या वर्षी काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे कागदी उत्तरपत्रिका वापरून परीक्षा देऊ देण्यावरही विचार सुरू आहे, असेही जावडेकर म्हणाले.यासाठी आधी प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात येईल. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची ‘नीट’ आणि ‘आयआयटी’ प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या दोन्ही परीक्षांना दरवर्षी देशातून प्रत्येकी १२ लाख विद्यार्थी बसतात. याशिवाय अन्य प्रवेशांसाठी राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाºया परीक्षा आणखी सुमारे दीड कोटी विद्यार्थी देत असतात.केंद्रीय परीक्षा नकोवैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय परीक्षा घेण्यास अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी आज लोकसभेत विरोध दर्शविला. राज्य सरकारांनाच प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अण्णा द्रमुकचे नेते व लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी केली.
‘नीट’, ‘जेईई’ प्रवेश परीक्षा आॅनलाइन नव्हे, कम्प्युटरवर; केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 12:56 AM