लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रॉकेलवरील शासकीय अनुदान आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड आता सक्तीचे करण्यात आले आहे. रॉकेलवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आणि अटल पेन्शन योजनेत अंशदान करण्यासाठी लाभार्थीला आधार कार्डचा क्रमांक द्यावा लागेल किंवा लाभ घेण्यासाठी नावनोंदणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. रॉकेलवरील अनुदानासाठी आधार कार्ड क्रमांक सादर करण्याची किंवा नावनोंदणीसाठी ३० सप्टेंबर २०१७ ही शेवटची तारीख आहे. अटल पेन्शन योजनेत आधार कार्ड क्रमांक सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून, २०१७ आहे. तथापि, आधार कार्ड प्राप्त होईपर्यंत रेशन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, किसान पासबुक (छायाचित्रासह), महात्मा गांधी नॅशनल एम्प्लायमेंट गॅरंटी स्कीमअंतर्गत दिलेले जॉब कार्ड आणि राजपत्रित अधिकाऱ्याने किंवा तहसीलदाराने दिलेले प्रमाणपत्र लाभार्थीला ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येईल.
रेशनच्या रॉकेलसाठी हवे ‘आधार’
By admin | Published: June 05, 2017 6:08 AM