शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पायाभूत सुविधांसाठी निधीची गरज; अर्थव्यवस्थेला मिळेल चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 4:07 AM

खासगी क्षेत्रात नफा दिसत नसल्याने गुंतवणुकीच्या प्रेरणा नाहीत.

प्रसाद जोशी नाशिक : यंदा अर्थसंकल्प मांडताना इराण-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य वातावरण, तेलाच्या भडकणाऱ्या किमती, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, देशांतर्गत अशांतता ही पार्श्वभूमी आहे. आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांची कसोटी लागणार आहे.

पायाभूत सुविधा मजबूत असतील, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळणे सोपे असते. देशात अद्यापही रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, वीज अशा विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठा वाव आहे. या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी कसा उपलब्ध होणार, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले अनेक पायाभूत सेवांचे प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यातीलकाही निधीअभावी रखडलेले आहेत. आर्थिक विकासाचा वेग कमी असल्याने करांपासून येणारे उत्पन्नही घटले आहे. सरकारने मागील अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पायाभूत सेवांच्या विकासाला निधी मिळण्यासाठी काही वेगळे उपाय योजले पाहिजेत.

त्यासाठी देश-विदेशांतील गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. ते केल्यास सरकारला दीर्घकालीन भांडवल पुरवठा करणाºया संस्था दीर्घकालीन मुदतीच्या कर्जरोख्यांद्वारे काही रक्कम उभारू शकतील. देशांतर्गत व परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक येऊ आल्यास मिळणारे भांडवल पायाभूत सेवांसाठी वापरता येईल. त्यातून रोजगार उपलब्ध होईल, तो वाढल्यास मागणी वाढेल, गुंतवणूक वाढेल. यामुळे देशातील उत्पादन आणि उत्पन्न वाढू लागेल. खासगी क्षेत्रातली गुंतवणूक वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण दीर्घकालीन धोरण अपेक्षित आहे. त्यातून परकीय वित्तसंस्थ व उद्योगांचा सरकारवरचा विश्वास डळमळीत होणार नाही. अमेरिका-चीनदरम्यानच्या व्यापार युद्धामुळे भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.अवघड, पण अशक्य नाहीखासगी क्षेत्रात नफा दिसत नसल्याने गुंतवणुकीच्या प्रेरणा नाहीत. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक सार्वजनिक व खासगी क्षेत्राने एकत्रितपणे करणे अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षांत रस्ते, घरबांधणी, रेल्वे, ऊर्जा, सिंचन आणि नागरी विकास या क्षेत्रात १०२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. हे अवघड आहे; पण अशक्य मात्र नाही. - प्रा. डॉ. शिशिर सिंदेकर, नाशिक.