महिलांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याची गरज : प्रतिमा पाटील
By admin | Published: January 01, 2017 12:47 AM
कोल्हापूर : महिलांनी हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करवीर औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केले. कणेरी (दत्त कॉलनी) येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. भीमशक्ती महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा दीपाली आवळे यांच्या विशेष प्रयत्नांतून महिलांना शिलाई मशीन, मिक्सर, ताडपत्री व कृषी साहित्याचे वाटप प्रतिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूर : महिलांनी हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करवीर औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केले. कणेरी (दत्त कॉलनी) येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. भीमशक्ती महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा दीपाली आवळे यांच्या विशेष प्रयत्नांतून महिलांना शिलाई मशीन, मिक्सर, ताडपत्री व कृषी साहित्याचे वाटप प्रतिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी महिलांनी संघटित होऊन प्रबोधन केल्यास महिलंावरील अन्याय रोखले जातील. कन्या वाचवा, बचत करा, आधुनिक शिक्षणाची कास धरा, शासकीय योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन प्रतिमा पाटील यांनी केले. ग्रामपंचायत सदस्या बेबीताई चोरडे, रेखा चोरडे, रेश्मा आवळे, सीमा माने, फुलाबाई चोरडे, मनीषा चौगुले, प्रियांका पवार, महानंदा दळवी, रेखा चौगुले, गीता लोहार, रूपाली शिंदे, मालूबाई लोहार, उषा मगदूम, संगीता केसरकर, मंगल चोरडे, सारिका चोरडे, संगीता भाकरे, मालूबाई चोरडे, रिना चोरडे, प्रियांका जाधव, पूजा काळे, नंदा कुरणे, आदी उपस्थित होत्या. शुभांगी चोरडे यांनी आभार मानले. -----------------------------------------------फोटो ओळी : कणेरी (दत्त कॉलनी) येथे आयोजित महिला मेळाव्यात प्रतिमा पाटील यांच्या हस्ते महिलांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपाली आवळे, आदी उपस्थित होते. (फोटो-३०१२२०१६-कोल-कणेरी)