हिंदी प्रचार, प्रसार करणे गरजेचे : मोहिते
By admin | Published: September 15, 2015 6:48 PM
नारायणगाव : हिंदी सोबत अन्य २१ भाषांना घटनात्मक दृष्टीने राजभाषा आणि राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे़ परंतु हिंदी विकासाच्या दृष्टीने हिंदीतर राज्यांमध्ये जितका प्रचार, प्रसार व्हायला पाहिजे तितका झाला नाही. जर आपली हिंदी विश्वभाषा बनवायची असेल, तर प्रत्येक घटकाने हिंदी प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे, असे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ़ दत्तात्रय मोहिते यांनी केले़
नारायणगाव : हिंदी सोबत अन्य २१ भाषांना घटनात्मक दृष्टीने राजभाषा आणि राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे़ परंतु हिंदी विकासाच्या दृष्टीने हिंदीतर राज्यांमध्ये जितका प्रचार, प्रसार व्हायला पाहिजे तितका झाला नाही. जर आपली हिंदी विश्वभाषा बनवायची असेल, तर प्रत्येक घटकाने हिंदी प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे, असे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ़ दत्तात्रय मोहिते यांनी केले़वारुळवाडी येथील आयडीबीआय या बॅँकेत राजभाषा हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी बॅँकेचे मॅनेजर दिलीप मांढरे, लाला बॅँकेचे संचालक सचिन कांकरिया, राहुल गरुड, प्रीती शिंदे, अंकिता गर्ग, ज्ञानेश्वर गर्जे उपस्थित होते़ मोहिते म्हणाले, की सुरुवातीच्या काळात राष्ट्रभाषा म्हणून दक्षिण भारतीय राज्यांनी हिंदीचा खूप विरोध केला. त्यामागे पारंपरिक, राजकीय आणि भाषिक कारणे होती़. राजभाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळावी, याकरिता मतदान घ्यावे लागले. त्या वेळी समितीने घेतलेल्या मतदानात ७७ विरुद्घ ७७ असे सम मतदान झाले़ त्यानंतर पुन्हा मतदान होऊन ७८ मते मिळाल्यानंतर हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळाली़ आज ही राष्ट्रभाषा भारताच्या बाहेरही बोलली जाते़ या राष्ट्रभाषेला विशेष असे महत्त्व आहे़ अनेक राज्यांमध्ये हिंदीमधूनच बोलले जाते.दिलीप मांढरे म्हणाले, की हिंदी भाषेचे महत्त्व सर्वांना ज्ञात व्हावे. यासाठी हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला़ फोटो : वारूळवाडी येथे राजभाषा हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ़ दत्तात्रय मोहिते.