शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

समलैंगिकांच्या हक्कांचे रक्षण गरजेचे - डॉ. हर्षवर्धन

By admin | Published: July 18, 2014 9:56 AM

समलैंगिक हे अन्य नागरिकांप्रमाणे असल्याने त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १८- समलैंगिक व्यक्ती हे अन्य नागरिकांप्रमाणे असल्याने त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. समलैंगिकतेला विरोध दर्शवणा-या भाजपच्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांने असे सूचक विधान केल्याने भाजपने या संवेदनशील विषयावरील भूमिका बदलल्याचे दिसते. 
गुरुवारी एका कार्यक्रमात पत्रकारांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना समलैंगिकांचे हक्क आणि या संबंधांना गुन्हेगार ठरवणारा कायदा याविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क दिलेले असतात. सरकारने त्याच्या या हक्कांचे रक्षण करणे गरजेचे आहे. 
सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणा-या भारतीय दंड विधानातील कलम ३७७ मध्ये बदल करण्यास नकार दिला होता. त्यावेळी  विरोधी बाकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निर्णयाचे समर्थन केले होते. या कायद्यात बदल करण्याची मागणी समलैंगिकांसाठी काम करणा-या समाजसेवी संघटना करत असल्या तरी त्यावेळचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र समलैंगिक संबंधांना अनैसर्गिक ठरवले होते. 
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत समलैंगिकतेला कडाडून विरोध केला आहे. यापासून फारकत घेत डॉ. हर्षवर्धन यांनी समलैंगिक संबंधांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले. भाजपच्या भूमिकेशी तुम्ही फारकत घेतली आहे का या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले आहे.