"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:13 PM2021-05-10T15:13:17+5:302021-05-10T15:18:49+5:30
Congress CWC : नुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली
नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कागगिरी चांगली करण्याचं सदस्यांना आवाहन केलं आहे. तसंच निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला पुन्हा पराभवाचा फटका बसला आहे.
"आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
The meeting of the Congress Working Committee (CWC) begins
— ANI (@ANI) May 10, 2021
Interim Pres Sonia Gandhi says that the Modi govt has abdicated its responsibility and left vaccination to States. It would have been financially more equitable for the Centre to provide free vaccine to all, she adds. pic.twitter.com/4GGv2xi40O
Elections for Congress President further postponed. Due to #COVID19 situation, it has been decided in CWC meet to postpone it as it won't be correct to hold elections in this scenario. In last CWC meet, Central Election Authority had proposed 23rd June as the poll date: Sources pic.twitter.com/Rj42TXykCr
— ANI (@ANI) May 10, 2021
"केरळ आणि आसाममधील विद्यमान सरकारला सत्तेतून काढून टाकण्यासाठी आपण का अयशस्वी झालो आणि बंगालमध्ये आपले खाते का उघडले नाही, हे आम्हाला समजून घेतले पाहिजे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. २ जानेवारीला आपली बैठक झाली तेव्हा आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
महासाथीवरून साधला निशाणा
यावेळी देशातील कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीबद्दल सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "राष्ट्रीय इच्छाशक्ती दाखविण्यासाठी व संकल्प करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे. प्रत्येकाला लस दिली गेली पाहिजे आणि लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने उचलावा," असंही सोनिा गाँधी यावेली म्हणाल्या. तसंच त्यांनी यावेळी मागील वेळच्या बैठकीचा उल्लेख केला.
"गेल्या वेळी १७ एप्रिल रोजी आपली भेट झाली होती. यानंतर चार आठवड्यातच कोरोनाची परिस्थिती भयावह झाली. सरकारचा नाकर्तेपणा समोर आला आणि वैज्ञानिकांचा सल्लाही जाणूनबुजून दुर्लक्षित केला गेला," असंही त्या म्हणाल्या.
महासाथीबाबत निष्काळजीपणा
"मोदी सरकारनं कोरोना महासाथीबाबत निष्काळजीपणा केला आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमांना जाणूबुजून परवानगी दिली. त्याची किंमत आज देशाला भोगावी लागत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. लसीकरण मोहीमही अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. त्याचा विस्तार हव्या त्या गतीनं केला जात नाही," असंही सोनिया गांधी यांनी नमूद केलं.