शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सुपेकर, रायतेंच्या निलंबनासाठी सीआयडी अहवाल आवश्यक : दीक्षित

By admin | Published: November 15, 2015 11:13 PM

जळगाव : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार केला जाईल, मात्र त्यासाठी सीआयडीचा अहवाल आवश्यक असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते़

जळगाव : जळगावमधील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सीआयडी चौकशीत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांच्या निलंबनाचा विचार केला जाईल, मात्र त्यासाठी सीआयडीचा अहवाल आवश्यक असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते़
पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्येच्या तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देताना दीक्षित म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून, ती स्वतंत्र व सक्षम यंत्रणा आहे़ यावर पत्रकारांनी संशयित पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते हे जळगावमध्येच कार्यरत असल्याने सीआयडी तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता सीआयडी अधिकार्‍यांवर दबाव नसून तसे असल्यास ते त्यांचा अहवाल मला पाठवतील़ त्यांनी अशा स्वरूपाचा अहवाल पाठविल्यास या दोन्ही अधिकार्‍यांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले़ त्यामुळे या अधिकार्‍यांची पोलीस महासंचालक पाठराखण करीत असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे़
पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन ऑक्टोबरमध्ये आत्महत्त्या केली़ तत्पूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सुपेकर, रायते, चौधरी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे़ यावेळी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील, पकंज डहाणे, अविनाश बारगळ आदिंसह अधिकारी उपस्थित होते़
--इन्फो--
सीआयडीचे तिघांना समन्स
सादरे आत्महत्त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे, संशयित सागर चौधरीचे वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी व राजेश मिश्रा या तिघांना समन्स काढले असून, त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे़ या तिघांचीही नाशिकच्या कार्यालयात वेगवेगळी चौकशी केली जाणार असून, रवींद्र चौधरी यांची सोमवारी (दि़१६) चौकशी केली जाणार असून, या चौकशीसाठी प्रश्नावलीदेखील तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे़
नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालयातील आढावा बैठकीत बोलताना राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित़ समवेत पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, पोलीस उपायुक्त विजय पाटील़