निधीअभावी रखडले नाट्यगृहाचे काम १४ कोटींची आवश्यकता : इलेक्ट्रीकल व प्रतिध्वनी रोधक यंत्रणेचे काम अपूर्ण
By admin | Published: July 21, 2016 10:21 PM
जळगाव : महाबळ परिसरात १२०० प्रेक्षक क्षमता असलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून इलेक्ट्रीकल व प्रतिध्वनीरोधक यंत्रणेसाठी निधी प्राप्त झालेला नसल्याने हे काम रखडले आहे. त्यासाठी १४ कोटींची आवश्यकता आहे.
जळगाव : महाबळ परिसरात १२०० प्रेक्षक क्षमता असलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून इलेक्ट्रीकल व प्रतिध्वनीरोधक यंत्रणेसाठी निधी प्राप्त झालेला नसल्याने हे काम रखडले आहे. त्यासाठी १४ कोटींची आवश्यकता आहे. तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी महाबळ परिसरातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निवासस्थानाच्या शेजारी १० हजार १७ चौरस मीटर क्षेत्रातील भव्य नाट्यगृहाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीला देखील मंजुरी देण्यात आली होती.१२०० आसनक्षमतेचे नाट्यगृहजळगावातील सांस्कृतिक चळवळीला नाट्यगृहाच्या बांधकामानंतर वेग येणार आहे. या नाट्यगृहाची आसनक्षमता ही १२०० इतकी आहे. आतापर्यंत २५ बाय १५ च्या स्टेजची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासोबत हॉल एन्ट्री, वर्कशॉप, कलाकारांसाठी ग्रीन रूम यासोबत व्हीआयपी कक्ष तयार करण्यात आला आहे.दर्शनी भागाचे काम पूर्णनाट्यगृहाच्या दर्शनी भागाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात प्रवेश मार्ग, तिकिट रुम, व्यवस्थापकांचा कक्ष, कर्मचार्यांसाठी कक्ष, सुरक्षा रक्षकांसाठीचा कक्ष तसेच लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. इलेक्ट्रीक फिटींगच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने फॉल सिलींगचे काम बाकी आहे.प्रतिध्वनी रोधक यंत्रणेचे काम अपूर्णनाट्यगृहाचे बांधकामाशी संबधित ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र इलेक्ट्रीक फिटींग तसेच प्रतिध्वनी रोधक यंत्रणेचे काम अजून बाकी आहे. इलेक्ट्रीक फिटींगच्या कामासाठी साडे चार कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित होती. मात्र उच्च क्षमतेच्या साहित्याचा यात वापर करण्यात येणार असल्याने हा खर्च साडेसात कोटींपर्यंत पोहचला आहे. इलेक्ट्रीक फिटींगसाठीची टेंडरप्रक्रिया अद्याप झालेली नाही.नाट्यगृहावर आतापर्यंत १७ कोटींचा खर्चया नाट्यगृहावर आतापर्यंत १७ कोटी ३१ लाखांचा खर्च झाला आहे. निधीअभावी नाट्यगृहाचे काम रखडल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला होता. नाट्यगृहासाठी २०१३-१४ यावर्षी सात कोटी, २०१४-१५ यावर्षी ५ कोटी, २०१५-१६ या वर्षात ५ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. इलेक्ट्रीक फिटींगला सुरुवात झालेली नसल्याने उर्वरित काम प्रलंबित आहे.१७ कोटींपर्यंत खर्च झाला आहे. अजून १४ कोटींचा निधी अपेक्षित आहे.प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता, जळगाव विभाग.