एकजुटीने शेतकर्यांना आधार देण्याची गरज
By admin | Published: March 14, 2016 12:21 AM
जे. एम. पारधे : अबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनर्फे मदत वाटप
जे. एम. पारधे : अबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनर्फे मदत वाटपजळगाव : समाजाने एकजुटीन शेतकर्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे आत्महत्यांसारख्या दुदैवी घटना घडणार नाही. अशा परिवारांच्या मदतीसाठी प्रयत्न होने आवश्यकआहे. वीजेची जोडणी शक्य नसलेले शेतकरी सोलर पंपाची मदत घेवू शकतात. काही शेतकर्यांची वीज बिल भरण्याची ऐपत नाही मात्र सधन शेतकर्यांनी आपली वीजेची बिले थकवू नये. लोडशेडिंग व्यतिरिकत्त संपूर्ण वेळ शेतकर्यांसाठी वीज देण्यासाठी अभियंत्यांकडून प्रयत्न होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वीज वितरण कंपनीने मुख्य अभियंता जे. एम. पारधी यांनी व्यक्त केले.अबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या परिवार व शौर्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांला मदत व नवीन अभियंत्यांच्या स्वागत सामारंभ कार्यक्रम झाला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी एस. आर. वाणी, संस्थेचे पदाधिकारी एस.आर. पाटील, संस्थेचे माजी सहसचिव दौलत निकुंभे, सेवानिवृत्त पदाधिकारी डी. एन. पाटील, अमरावतीचे कार्यकारी अभियंता जी.टी. सपकाळे, सहसचिव कुंदन भंगाळे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जैन उद्योगसमुहाचे स्व. भवरलाल जैन, व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.आत्महत्याग्रस्त परिवारांना मदतयावेळी आत्महत्या ग्रस्त शेतकरी बाळू सुपडू काळे (कुर्हा (पानाचे)यांच्या पत्नी आशाबाई काळे, अनिल धर्मा पाटील (निंभोरा ता भडगाव) यांच्या पत्नी आशाबाई पाटील, अरुण राजाराम मनोरे (रत्नपिंप्री ता. पारोळा) यांच्या पत्नी अनिता मनोरे. तर महेंद्र कोळी ( खर्डी ता. धरणगाव) यांचा मुलगा लोकेश कोळी याला रोख मदत व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.शौर्यासाठी मदतनुकताच राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात अलेल्या कोथडी ता. मुक्ताईनगरच्या नीलेश रेवाराम भिल या विद्यार्थ्याचा पालकांसह सत्कार करुन मदत देण्यात आली. यावेळी कुंदन भंगाळे, एस.आर. वाणी, अभियंता जी.टी. सपकाळे, दौलत निकुंभे यांनी मनोगत व्यक्त केले. व नविन रुजु झालेल्या अभियंत्यांचे स्वागत करुन मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन व आभार पराग चौधरी यांनी मानले. जशस्वीतेसाठी अभियंता मिलिंद इंगळे व असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जोड आहे)